महाशिवरात्री ८ की ९ मार्चला? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त
![Mahashivratri on March 8 or 9? Know the correct date and time](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Mahashivratri-2024-1-780x470.jpg)
Mahashivratri 2024 | हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महाशिवरात्री उत्सव दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्याची परंपरा आहे. शिवपुराणानुसार या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता. याचबरोबर त्यांनी संन्यासाचे जीवन सोडून गृहस्थाचे जीवन सुरू केले अशी आख्यायिका सांगितली जाते. यंदाच्या वर्षात महाशिवरात्री कधी आहे, याची तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया…
महाशिवरात्री तिथी
फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीची सुरुवात – ८ मार्च रोजी रात्री ०९.५७ वाजता सुरू होईल.
फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीची समाप्ती – ९ मार्च संध्याकाळी ०६.१७ पर्यंत.
महाशिवरात्रीची अचूक तारीख – ८ मार्च २०२४.
महाशिवरात्री पुजेचा मुहूर्त
महाशिवरात्रीच्या निशिता पूजेची वेळ – रात्री उशिरा १२.०७ ते १२.५६ मिनिटांपर्यंत.
निशिता काल पूजेची वेळ – ९ मार्च रोजी दुपारी १२.१३ ते ०१.०१ मिनिटांपर्यंत.
हेही वाचा – महाशिवरात्रीला घडत आहेत दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या सर्व शुभ मुहूर्त
रात्री प्रथम प्रहर पूजा वेळ : संध्याकाळी ६.२९ ते रात्री ९.३३ मिनिटांपर्यंत.
रात्रीची दुसरी प्रहर पूजा वेळ : ८ मार्च रोजी सकाळी ९.३३ मिनिटे ते ९ मार्च रोजी १२.३७ मिनिटांपर्यंत.
रात्री तृतीया प्रहर पूजा वेळ : ९ मार्च रोजी सकाळी १२.३७ ते पहाटे ३.४० मिनिटांपर्यंत.
रात्री चतुर्थ प्रहर पूजा वेळ : ९ मार्च सकाळी ३:४० ते सकाळी ६:४४ मिनिटांपर्यंत.
महाशिवरात्री शुभ योग
हिंदू कॅलेंडरनुसार, या दिवशी सकाळपासून सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. सकाळी ६.४५ ते १०.४१ पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असेल. याशिवाय ९ मार्च रोजी पहाटे ४.४५ ते १२.४५ या वेळेत शिवयोग होणार आहे.
महाशिवरात्री पारण वेळ
महाशिवरात्री पारणाची वेळ ९ मार्च रोजी सकाळी ६.४४ ते ६.१८ मिनिटांपर्यंत आहे.