‘…तर पोलिसांना कारवाई करावी लागेल’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/सुप्रिया-सुळे-यांची-तुफान-टोलेबाजी-अजित-पवार-यांना-दिलं-जोरदार-प्रत्युत्तर-3-780x470.jpg)
Devendra Fadnavis On Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशा मागणीसाठी सगेसोयरेच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. जालन्यातील अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत यामुळे मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. मला विष देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी सागर बंगल्यावर येण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर अंतरवाली सराटीत मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. अशातच आता मनोज जरांगेंच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
मनोज जरांगेंवर कारवाई करणार का? असा सवाल देवेंद्र फडणवीसांना विचारला गेला. तेव्हा, सागर बंगला हा सरकारी बंगला आहे, तिथं कोणालाही अडवलं जाणार नाही. जरांगेंना कुठली सहानुभूती घेयचीये, मला माहित नाही. त्यांचे आरोप धादांत खोटे आहेत. मराठा आरक्षण मी हायकोर्टात टिकवलं. मी सर्वोच्च न्यायालयात देखील आरक्षण टिकवलं. माझ्यानंतर जे मुख्यमंत्री आले, त्यांना ते टिकवता आलं नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
हेही वाचा – मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने; मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री सह्याद्री अतिथीगृहात दाखल
जी स्क्रिप्ट आत्तापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते, पवार साहेब बोलत होते, तीच स्क्रिप्ट, तेच विषय जरांगेंनी का मांडावे? असा प्रश्न आहे. याच्याच्या पाठीशी काय आहे? मुख्यमंत्र्यांनी जे काही सांगतं, त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. कुणीही आंदोलन केलं तर आमची काहीही हरकत नाही, परंतू कायदा आणि सुव्यवस्था जर बिघडवली तर कारवाई करावी लागेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, १. सीएम, २ डीसीएम या तिघांपैकी जनरल डायर कोण? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केलाय. जरांगेंच्या आरोपानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलीय. जनरल डायर कोण, हे समजायला पाहिजे. वरिष्ठांच्या आदेशाशिवाय पोलीस लाठीचार्ज करणार नाहीत, असंही ते म्हणाले. तर मनोज जरांगे हा आधीपासूनच दिशाहीन आहे. जो दिशाहीन आहे तो दिशा काय ठरवणार? अशा शब्दात भुजबळांनी जरांगेंवर टीका केलीय. सगेसोयरेबाबत सरकार अंमलबजावणी करत नसल्याने आज जरांगेंनी निर्णायक बैठक बोलावलीय. या बैठकीत पुढची दिशा ठरवली जाणार आहे. या बैठकीवरून भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधलाय.