पंतप्रधान मोदींच्या घराणेशाहीवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या..

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी घराणेशाहीवर जोरदार टीका केली. घराणेशाहीच्या राजकराणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं नुकसान झालं आहे. लोकशाहीमध्ये सहयोगाचा आणखी एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे. तुम्ही तुमचं मत मतदानाच्या रुपाने द्यायचं आहे. तुमच्यापैकी अनेकजण असे असतील जे येत्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. फर्स्ट टाईम व्होटर्स आपल्या लोकशाहीत नवी उर्जा आणि शक्ती आणू शकतील. यामुळे मत करण्यासाठी तुमचं नाव लिस्टमध्ये येण्यासाठी लवकरात लवकर सर्व प्रक्रिया पूर्ण करा. तुमच्या पॉलिटिकल व्हुयजपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तुमचं मतदान. २५ वर्षांचं हे अमृतकाल तुमच्यासाठी कर्तव्यकालसुद्धा आहे.
हेही वाचा – नाशिकच्या काळा राम मंदिरातील स्वच्छता मोहिमेवरून संजय राऊतांची मोदींवर टीका; म्हणाले..
पंतप्रधानांचा मान सन्मान केला पाहिजे. मी अतिशय प्रांजळपणे एक गोष्ट सांगते. ते वयाने, पदाने मोठे आहेत. एखादा ज्येष्ठ व्यक्ती काही बोलला तर त्यावर बोलणं योग्य नाही. पण अशावेळी मला अमित शाहांचं एक वाक्य आठवतं. अमित शाह आम्हालाच उद्देशून म्हणाले होते की, एक बोट तुम्ही आम्हाला दाखवता, तेव्हा तीन बोटं तुमच्या कडे असतात, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मला व्यासपीठावर कोण कोण बसलं होतं माहित नाही. पण त्याच व्यासपीठावर घराणेशाहीचे किती नेते बसले असतील? व्यासपीठावर असलेल्या पहिल्या पाच नेत्यांची तुम्ही नावे घेतली, ते सर्वजण घराणेशाहीतीलच नेते आहे, यात माझं काही चुकतंय का? असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.





