डेव्हिड वॉर्नरची क्रिकेटच्या मैदानात हेलिकॉप्टरमधून एन्ट्री; व्हिडीओ व्हायरल..
David Warner’s helicopter video
![David Warner's helicopter entry into the cricket ground](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/David-Warners-helicopter-video-780x470.jpg)
David Warner’s helicopter video : ऑस्ट्रेलिया संघाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने काही दिवसांपुर्वी वनडे आणि कसोटीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. निवृत्तीमुळे डेव्हिड वॉर्नर चांगलाच चर्चेत होता. मात्र, आता पुन्हा एकदा वॉर्नर चर्चेत आला आहे. डेव्हिड वॉर्नर हेलिकॉप्टरने क्रिकेटच्या मैदानावर पोहोचला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Dave Warner.
In a Helicopter.
Arriving at the SCG.Here's how it happened. @davidwarner31 @ThunderBBL @scg #BBL13 pic.twitter.com/v7QRCkauH5
— KFC Big Bash League (@BBL) January 12, 2024
हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशातील तरूणांना मोठं आवाहन; म्हणाले..
बिग बॅश लीगमध्ये शुक्रवारी सिडनी थंडर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात ३४ वा सामना खेळला गेला. या सामन्यासाठी वॉर्नर हेलिकॉप्टरने सिडनीच्या मैदानावर पोहोचला. कृष्णधवल हेलिकॉप्टर मैदानात उतरताच वॉर्नर त्यातून खाली उतरला. वॉर्नर टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये अतिशय कॅज्युअल स्टाईलमध्ये दिसला. वॉर्नर हेलिकॉप्टरमधून उतरताच त्याने दरवाजा उघडणाऱ्या व्यक्तीशी हस्तांदोलन केले आणि बॅग लटकवून मैदान सोडण्यास सुरुवात केली.