Breaking-newsताज्या घडामोडी

इंडियन मेडिकल असोसिएशन आणि युवा परिवर्तन तर्फे मोफत तपासणी शिबीर संपन्न

सोनावळे गावात १२५ गावकऱ्यांची तपासणी

पालघर : इंडियन मेडिकल असोसिएशन मुंबई शाखा आणि युवा परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आओ गाव चले’ या उपक्रमांतर्गत पालघर येथे मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पालघर येथील सोनावळे या गावात डॉक्टरांनी १२५ गावकऱ्यांची तपासणी केली आणि त्यांना रक्तदाब, मधुमेह, हायपरटेंशन, एनिमिया अशा असंसर्गजन्य आजारांविषयी मार्गदर्शन केले. याबरोबर प्राथमिक स्वच्छता तसेच असंसर्गजन्य आजार झाल्यास कोणते प्राथमिक उपचार घ्यावेत याविषयीही गावकऱ्यांना माहिती दिली.

प्रल्हाद सोनावळे हे कळंबे या गावातील रहिवासी आहेत. गावात अशा प्रकारचे तपासणी शिबीर घेणे गरजेचे असल्याचे ते सांगतात. या तपासणी शिबीराचा फायदा आमच्या ओळखीतील गावकऱ्यांना झाला. अनेकदा आजारावर योग्य ती काळजी घ्यायची याबद्दलही डॉक्टरांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा  –  खासदार अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला; नरेंद्र मोदींचाही उल्लेख!

गेल्या तीन वर्षांपासून इंडियन मेडिकल असोसिएशन हे ‘आओ गाव चले’ हा उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमातंर्गत आयएमएचे ज्येष्ठ डॉक्टर गावकऱ्यांसाठी मोफत तपासणी शिबीर आयोजित करतात. या वेळेस त्यांनी वाडा येथील कळंबे हे गाव दत्तक घेतले आहे. कळंबेमधील गावकऱ्यांना रक्तदाब, पीसीओडी, एनेमिया, हायपरटेंशन या असंसर्गजन्य आजाराची तपासणी केली. आणि त्यांना एक महिन्याच्या गोळ्या आणि औषधे दिली. याचबरोबर आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) तर्फे शाळेत पंखे, कपाट, स्टेशनरी साहित्य आणि महिलांना सॅनिटरी पॅड्स, याचेही वाटप केले असल्याचे ‘आओ गाव चले’ या उपक्रमाचे प्रमुख डॉ. किरण देसाई यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button