Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने निवारा आश्रमात ब्लॅंकेट वाटप

शहाराध्यक्ष तुषार कामठे यांचा पुढाकार; शरद पवार यांच्या वाढदिनानिमित्त विधायक उपक्रम

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड विधानसभेचे अध्यक्ष सागर मधुकर चिंचवडे यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील बेघर गरजूना थंडीत मायेची उब मिळावी या उद्देशाने ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

तसेच शहरातील बेघर लोकांना निवारा सावली या ठिकाणी देखील ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले की, साहेब जसे समाजातील शेवटच्या घटकांसाठी काम करतात, तसे आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत.

हेही वाचा  –  ‘शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे दिमाखदार आयोजन करा’; मंत्री उदय सामंत 

याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे,गणेश भोंडवे, प्रशांत सकपाळ,योगेश सोनवणे,विशाल जाधव,मयूर जाधव,माधवराव पाटील,सेवा दलाचे अरुण थोपटे,दिलीप पानसरे,विनय शिंदे,आशिष पांढरे, शौल कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button