‘मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनी केला’; देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
![Devendra Fadnavis said that Sharad Pawar was the biggest opposition to Maratha reservation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Sharad-Pawar-and-Devendra-Fadnavis-780x470.jpg)
मुंबई : नागपूर येथे भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार यांनी केला असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध शरद पवारांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार असतांना सुप्रिया सुळे यांचं विधानं आपण पाहिली आहेत. मंडल आयोग लागू झाला. तेव्हा देता आलं असता. न्यायालयाचे निवडे आले. तेव्हा देता आले असता. परंतु त्यांना कधीच द्यायचं नसंत. त्यांना फक्त समाजाला झुंजवत ठेवायचं होतं. त्यामुळे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. परंतु आपण मराठा समाजाला आरक्षण दिलेच, परंतु कोर्टात ते टिकवून ठेवलं. त्यानंतर सरकार गेल्यानंतर त्यावर स्थगिती आली.
हेही वाचा – संसद घुसखोरी प्रकरणातील आरोपींच्या चौकशीनंतर धक्कादायक माहिती समोर
मंडल आयोगाला सर्वात जास्त विरोध छगन भुजबळांनी केला होता. मग आता मराठा आरक्षणाला विरोध का करत आहेत? मराठा समाजाला आरक्षण देणार परंतु, काहीही झालं तर ओबीसी समाजाच्या आरक्षणावर संकट येऊ देणार नाही, हे आम्ही कमेंटमेंट दिली आहे. तसेच कार्यकर्त्यांनी मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे. असं समजून सांगा. तसेच ओबीसी आणि मराठा समाजातील विभाजनचं लोण पसवू देऊ नका. निवडणुकांची आपण चिंता करत नाही. यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.