breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

संसद घुसखोरी प्रकरणातील आरोपींच्या चौकशीनंतर धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना १३ डिसेंबर रोजी लोकसभेत गदारोळ झाला. प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी लोकसभेत उडी मारून कॅनमधील पिवळा धूर सोडला. याप्रकरणात मनोरंजन, अमोल शिंदे, नीलम, ललित झा यांच्यासह काहींची नावे समोर आली आहेत. आरोपींची दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

या प्रकरणातील मास्टरमाईंट ललित झा याला काल परियाला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली आहे. या घटनेमागील कथित सूत्रधार ललित झा आणि त्याच्या सहआरोपींना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला भाग पाडण्यासाठी देशात अराजकता निर्माण करायची होती, असं दिल्ली पोलिसांनी न्यायालयाकडे त्यांच्या रिमांड याचिकेत नमूद केले.

हेही वाचा  –  केंद्र सरकारचा यू-टर्न! इथेनॉलच्या निर्मितीवरील निर्बंध अखेर मागे

संसदेच्या आवारात आणि लोकसभेच्या सभागृहात धूर पसरवत गोंधळ घालणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. तसंच हे आरोपी ज्या दाम्पत्याकडे राहिले होते त्यांनाही पोलिसांनी अटक केली. यानंतर या कटाचा मास्टरमाईंड ललित झा हा फरार होता. त्याने पोलिसांसमोर गुरुवारी उशिरा आत्मसमर्पण केलं. त्यानंतर आज ललितला पटियाला हाऊस कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने स्वतःच आपण या कटाचा सूत्रधार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच या प्रकरणी आता त्याची कसून चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button