संजय राऊतांवर टीका करताना प्रसाद लाड यांची जीभ घसरली; म्हणाले..
![Prasad Lad said that he will file a claim against Sanjay Raut for damages of 200 to 500 crores](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Prasad-Lad-and-Sanjay-Raut-780x470.jpg)
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. यावरून आमदार प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊतांविरोधात २०० ते ५०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असं प्रसाद लाड म्हणाले.
प्रसाद लाड म्हणाले, शिवसेना खासदार संजय राऊतांची पत्रकार परिषद ऐकली. काही पत्रकारांच्या माध्यमातून मला माहिती मिळाली की, संजय राऊत सातत्याने माझा आणि माझ्या कंपनीचा उल्लेख करत आहे. प्रसाद लाड आणि क्रिस्टल कंपनीचा १ हजार कोटींचा भ्रष्टाचार वगैरे. संजय राऊतांच्या संसदीय भाषेत बोलायचं झालं, तर संजय राऊत *** झालाय. ज्या गोष्टीचा काही संबंध नाही, ज्याला कसल्याही माहितीचा आधार नाही. कशामध्ये नाव घ्यायचं? कशात नाही घ्यायचं? हे कळत नाही. अशा माणसाला हीच संसदीय भाषा वापरली पाहिजे.
हेही वाचा – कांदा प्रश्नावरून शरद पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाले..
आपल्या माध्यमातून मी संजय राऊतांना सांगू इच्छितो की, यापुढे त्यांनी माझं किंवा माझ्या कंपनीचे नाव घेतलं, तर स्वप्नातला संजय राऊत काय आहे? हे मी प्रसारमाध्यमांसमोर आणेल. त्याचे व्हिडीओ लोकांसमोर आणेल. मी माझ्या वकिलांशी चर्चा करून उद्या सकाळपर्यंत संजय राऊतांविरोधात २०० ते ५०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असं प्रसाद लाड म्हणाले.
उधळलेल्या रेडकूला मारण्यासाठी भाल्याचा वापर केला जातो. अशा रेडकूला भाल्याने मारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आक्रमक भूमिका घेत आहे. मेहनतीने उभं केलेल्या साम्राज्याला कुणी खोटारडेपणाने डाग लागत असेल तर छत्रपतींनी दिलेली शिकवण आहे, अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचं, असंही प्रसाद लाड म्हणाले.