‘रात्री कोण कुणाच्या घरी जातं, याचे माझ्याकडे व्हिडीओ’; सुजय विखेंचा रोख नेमका कोणाकडे?
![Sujay Vikhe Patil said that I have videos of who goes to whose house at night](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Sujay-Vikhe-Patil-780x470.jpg)
मुंबई : भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा खासदार सुजय विखे पाटील यांचे एका सभेतील वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. रात्री कोण कुणाच्या घरी जातं, याचे माझ्याकडे व्हिडीओ आहेत, असं सुजय विखे पाटील भर सभेत म्हणाले. यानंतर विखेंचा रोख नेमका कुणाकडे याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
सुजय विखे पाटील म्हणाले, कुणाचं खातं कोणत्या बँकेत आहे, कोण कुठं जातं, कोण रात्री बाहेर पडतं, कुणाच्या घरी जातं हे मला पूर्णपणे माहिती आहे. माझ्याकडे याचं व्हिडीओ शुटिंगही आहे. मी ६ महिन्यांपूर्वीच यांच्यामागे लोकं ठेवली आहेत. हे काय करतात, काय नाही हे सगळ्या पुराव्यांसह दाखवेन. फक्त त्यांना एकदा उभं राहू द्या.
हेही वाचा – IPL 2024 लिलावासाठी ११६६ खेळाडूंनी नोंदवली नावे; ‘या’ खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी
माझ्याकडे सगळ्यांची उत्तरं आहेत. तुम्हाला माहिती आहे की, मी कशी भाषणं करतो. त्यामुळे मला ते सांगायची गरज नाही.” “वेळ आल्यावर सर्व व्हिडीओ दाखवणार आहे. आरोप करणाऱ्यांचे कपडेही ठेवणार नाही, असंही सुजय विखे पाटील म्हणाले.