पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत थांबलेल्या तरूणाची चाकूने भोसकून हत्या
![A young man was stabbed to death along the old Pune-Mumbai highway](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Pune-Mumbai-highway-780x470.jpg)
पुणे : पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत थांबलेल्या तरुणाला, तू इथे का थांबलास? अशी विचारणा करत चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करून तरुणाच्या छातीत चाकू भोसकून हत्या केली. कृष्णा शेळके असं हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा शेळके हा इतर दोन मित्रांसह पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत अंधारात थांबला होता. तिघांना बघून चार अज्ञात व्यक्ती त्यांच्याकडे आले, तुम्ही इथं का थांबलात कशासाठी थांबलात? अशी विचारणा करत त्याच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. थोड्या वेळात वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. चौघांपैकी एकाने चाकू काढून थेट कृष्णाच्या छातीत भोसकला. यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा – व्हायरल ऑडिओ क्लिपवर छगन भुजबळांचं स्पष्टीकरण; म्हणाले..
कृष्णा हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाही. केवळ अंधारात थांबल्यामुळे त्याला इतर चार व्यक्तींनी विचारना केल्याने त्यावरून त्याच्यासोबत वाद झाला. अशी माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे. याघटने प्रकरणी तळेगाव पोलीस अज्ञात चार जणांचा शोध घेत आहेत.