breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

व्हायरल ऑडिओ क्लिपवर छगन भुजबळांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची एक ऑडिओ क्लिप संध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये भुजबळांचाच आवाज असल्याचं सांगितलं जात आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये छगन भुजबळ ‘ओबीसी काही वाचणार नाही आता’ असं म्हटल्यामुळे जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, यावरून छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

छगन भुजबळ म्हणाले, सगळीकडे ओबीसी आरक्षणावर आक्रमण चालू आहे. आमदारांची घरं पेटवली जात आहेत.ओबीसी कार्यकर्त्यांची हॉटेलं पेटवली जात आहेत. यासंदर्भात आपण कुणीतरी आता बोललं पाहिजे. ते एका आवाजात बोललं पाहिजे हा त्याचा अर्थ आहे. जसं इतर लोक त्यांच्या समाजाला आवाहन करू शकतात, तसंच मीही ओबीसींमधल्या ३७५ जातींना आवाहन करू शकतो की आपणही आपलं दु:ख एकमुखानं मांडलं पाहिजे.

हेही वाचा – पुनावळे कचरा डेपोविरोधी आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा

ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे?

ऑडिओ क्लिपमध्ये छगन भुजबळ दुसऱ्या एका व्यक्तीशी फोनवर बोलत असून समोरची व्यक्ती आपण तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास भुजबळाना देताना ऐकू येत आहे. ‘ही सगळी मंडळी आली आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आपण आवाज उठवायला पाहिजे. मी तर म्हणतोच आहे की आता आवाज उठवा. एकतर आपण कुठपर्यंत लढणार. गावागावात त्यांचे बुलडोझर चालतायत. त्यात ओबीसी काही वाचणार नाही आता. त्यामुळे आता करेंगे या मरेंगे. हेच सगळ्यांनी करायला पाहिजे. असंही मरतंय, तसंही मरतंय. दुसरं काय. त्यांचं सगळं झालं. मी उभा राहतोय’, असं भुजबळ या क्लिपमध्ये म्हणताना ऐकू येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button