मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय ठराव, ठरावात नेमकं काय? वाचा..
![All party resolution on Maratha reservation, what exactly is in the resolution](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Eknath-Shinde--780x470.jpg)
मुंबई : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, अनिल परब, अशोक चव्हाण आदी नेते मंडळी उपस्थित होते. या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर या संदर्भात एक ठराव पारित करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी अधिक वेळेची मागणी करण्यात आली असून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती या ठरावात करण्यात आली आहे.
हेही वाचा – गायत्री इंग्लिश स्कूलमध्ये ‘दिवाळी मेला’; विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे
आज सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीतील ठराव…
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे. याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते व त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. कायदेशीर कार्यवाही… pic.twitter.com/xZREqrtD5M
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 1, 2023
ठरवामध्ये नेमकं काय म्हटलं?
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे. याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते व त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्र, त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे, हे पण लक्षात घेणे आवश्यक आहे. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे. या घटनांबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतो. राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते श्री. मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे, असा हा ठराव आहे.