गायत्री इंग्लिश स्कूलमध्ये ‘दिवाळी मेला’; विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे
दिवाळीनिमित्त शाळेत विविध उपक्रम
![Diwali died at Gayatri English School; Self-employment lessons for students](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/gayatri-english-medium-school-moshi-780x470.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना स्वंयरोजगार आणि व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावे. या उद्देशाने गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलने दिवाळीनिमित्त ‘दिवाळी मेला’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याद्वारे विद्यार्थ्यांना पणती बनवण्याचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे.
स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे (एसव्हीएसपीएम) संस्थापक व अध्यक्ष विनायक भोंगाळे यांच्या संकल्पनेतून भोसरी येथील गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास व्हावा. तसेच, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. या करिता विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
हेही वाचा – Weather Update : राज्यात हळूहळू गुलाबी थंडीला सुरूवात, हवामान खात्याचा इशारा
शाळेतील विद्यार्थ्यांनी यावर्षी दिवाळीनिमित्त आकर्षक पणत्या तयार केल्या आहेत. त्या सर्व वस्तुंचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना स्वत: बनवलेल्या वस्तुंची विक्री करण्याची संधी मिळणार आहे. पालकांना निमंत्रित करुन ‘दिवाळी मेला’ मध्ये खरेदीचा आनंद लुटता येणार आहे.
स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक कविता कडू- पाटील, सचिव संजय भोंगाळे, विश्वस्त सरिता विखे-पाटील यांनी या उपक्रमांचे कौतूक केले आहे.
व्यावहारिक जीवनात विद्यार्थ्यांना संतुलित जीवन जगता आले पाहिजे. त्यासाठी शालेय शिक्षणासह व्यवहारिक शिक्षणही महत्त्वाचे आहे. ‘दिवाळी मेला’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रेरणा देईल. शिक्षण आणि व्यवहारिक ज्ञान याचा संगम झाल्यास भविष्यकाळात प्रगल्भ पिढी घडेल, असा विश्वास आहे.
विनायक भोंगाळे, संस्थापक अध्यक्ष, एसव्हीएसपीएम.