मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची मराठा आंदोलकांकडून तोडफोड
![Minister Hasan Mushrif's car vandalized by Maratha protesters](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Hasan-Mushrif-780x470.jpg)
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्यातील आमदारांच्या घरांवर दगडफेक, जाळपोळीच्या घटना चालू आहेत. दरम्यान, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. मुंबईतील कुलाबा येथील आमदार निवासाजवळ हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली.
गाडीच्या तोडफोड प्रकरणी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्नी सरकार गंभीर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही यासंदर्भात बैठक झाली. आज सर्वपक्षीय बैठक आहे. लवकरात लवकर यावर तोडगा काढावा लागेल. कोर्टात काय होईल, काय होणार नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
हेही वाचा – ‘मराठा आरक्षणाच्या आड येणाऱ्यांच्या नरडीचा मी घोट घेईन’; शिंदे गटातील नेत्याचा इशारा
Maharashtra | Two men raising slogans for Maratha reservation seen vandalising the car belonging to State minister & NCP leader Hasan Mushrif at the MLAs' residence near Akashvani in Mumbai's Colaba, say police. Police have detained three people in this connection. pic.twitter.com/SulHanIChF
— ANI (@ANI) November 1, 2023
आज माझ्या गाडीवर दगडफेक झाली. दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करू नये असं मी गृहमंत्र्यांना सांगणार आहे. आमदारांची कुटुंबीय घरात असताना त्यांची घरं जाळणं हे दुर्दैवी आहे. अशा घटना अजिबात होऊ नयेत. त्यामुळे आंदोलनाला गालबोट लागता कामा नये. त्यामुळे सहानुभूती जाते, याचा विचार नेतेमंडळी आणि तरुणांनी केला पाहिजे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
मराठा आंदोलनात नेतृत्त्व दिसत नाही. आंदोलनाची दिशा कशी असावी हे समजून सागावं लागेल. अशा घटनांमध्ये स्थानिक विरोधक भाग घेऊन आंदोलन करत आहेत का अशी शंका आहे. सत्ताधारी स्वतःच्या आमदारांची घरे आणि गाड्या जाळतील का? स्थानिक पातळीवरचं राजकारण असल्याशिवाय अशा गोष्टी होत नाहीत, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.