breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मराठा आरक्षणाच्या आड येणाऱ्यांच्या नरडीचा मी घोट घेईन’; शिंदे गटातील नेत्याचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून राज्यात सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची धग कायम आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाच्या आमदारांनी केलेल्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्याला कुणी कडाडून विरोध केला हे सर्वांना माहीत आहे. मी ‘त्याचे’ नाव घेणार नाही. मात्र, यापुढे जर कुणी मराठा आरक्षणाला विरोध केला तर त्याचा जीव घेईल.

हेही वाचा – मनोज जरांगेंसाठी राज ठाकरेंचं भावनिक ट्विट; म्हणाले, जीव पणाला लावू नका..

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाचे भूमिपूजन सोहळा आज, मंगळवारी पार पडला. यावेळी हे विधान करून त्यांनी सभास्थळी खळबळ उडवून दिली. माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदारद्वाय रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, माजी खासदार उल्हास पाटिल यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांनी हे विधान केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button