इस्त्राईल-हमास युद्धाचे पडसाद पुणे शहरात उमटले, पुणे पोलिसांची कारवाई
![Repercussion of Israel-Hamas war in Pune city, action of Pune police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Israel-Hamas-War-Pune--780x470.jpg)
पुणे : इस्त्रायल आणि हमास मध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. इस्त्रायलकडून गाझात हल्ले सुरू आहेत. दरम्यान, या युद्घाचे पडसाद थेट पुण्यात उमटले आहेत. या प्रकरणी पुणे पोलिसांनी वेळीच कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
इस्त्रायल आणि हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही जणांकडून करण्यात आला. शहरातील काही भागांत इस्त्राईल देशाच्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेले स्टिकर्स लावण्यात आले. शहरातील रस्त्यांवरी इस्त्रायल देशाच्या राष्ट्रध्वजाचे स्टिकर्स लावण्यात आले.
हेही वाचा – भारताचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय! २० वर्षाचा दुष्काळ संपवला
Stickers with Israel flags were pasted on the streets in #Pune. Three separate cases have been registered in the matter with city Police. pic.twitter.com/zgXbt73L5i
— Punekar News (@punekarnews) October 23, 2023
पुणे शहरातील लष्कर, समर्थ, कोंढवा आणि खडक पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणात एकूण ६ आरोपी निष्पन्न झाले आहे. आरोपींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.