‘शरद पवार सुप्रिया सुळेंना हमासच्या दहशतवाद्यांशी लढण्यासाठी पाठवतील’; भाजप नेत्यांचा खोचक टोला
![Hemant Biswas Sharma Says Sharad Pawar Will Send Supriya Sule To Fight Hamas Terrorists](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/sharad-pawar-and-supriya-sule-780x470.jpg)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. यावरून देशातील राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. दरम्यान, यावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यापासून ते वाजपेयींपर्यंत सर्वांनी पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन दुर्दैवाने इस्त्रायलची बाजू घेतली आहे. जमिनीचे मूळ मालक असलेल्या पॅलेस्टाईनकडे ज्यांनी दुर्लक्ष केलं आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
हेही वाचा – नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग हे कसं ठरतं?
#WATCH | Delhi: On NCP chief Sharad Pawar's reported statement regarding India's stance on the Israel-Palestine conflict, Assam CM Himanta Biswa Sarma says, "I think Sharad Pawar will send Supriya (Sule) to Gaza to fight for the Hamas." pic.twitter.com/JrTWwIOM9T
— ANI (@ANI) October 18, 2023
मिडल इस्टमध्ये जो संघर्ष सुरु आहे त्याबाबत विचारलं असता हिमंता बिस्वा सर्मा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.मला वाटतं की सुप्रिया सुळेंना शरद पवार हमासच्या दहशतवाद्यांशी लढायला गाझाला पाठवतील, असं म्हणत हिमंता बिस्वा सर्मा यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे.