नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग हे कसं ठरतं?
![How is the color determined on which day in Navratri?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Navratri-Colours-2023-780x470.jpg)
Navratri 2023 : सध्या सर्वत्र नवरात्रौत्सवाची धुमधाम सुरू आहे. हा सण स्त्रियांसाठी मनसोक्त आनंद लुटण्याचा सण मानला जातो. या काळात प्रत्येक दिवशी ठरलेल्या रंगाचे कपडे परिधान केले जाते. पण हे रंग नेमके कसे ठरवले जातात? हे कोण ठरवतं? हे विशिष्ट रंग परिधान करण्यामागचे वैशिष्ट्य नेमके काय असतं? याबाबतची माहिती जाणून घेऊयात…
पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याकडे ग्रंथामधून प्रत्येक वाराला एक विशिष्ट रंग दिला आहे आणि त्यावरुनच हे रंग ठरवले जातात. यात एकच गोंधळ असतो तो म्हणजे आपल्याकडे सात वार आहेत. मग जे दोन वार परत येतात त्यादिवशी त्या रंगाचा ‘सिस्टर कलर’ म्हणजे त्याच्या जवळचा रंग त्या दिवसासाठी निवडला जातो. यामागचा उद्देश एकच तो म्हणजे आपण सर्वजण एक आहोत अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी यासाठी हे केलं जाते.
हेही वाचा – रोहित शर्माला मुंबई-पुणे महामार्गावर अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल दंड
यामागचा उद्देश एकच तो म्हणजे आपण सर्वजण एक आहोत, अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी, यासाठी हे केलं जाते. याचा कुठेही, कोणत्याही ग्रंथात उल्लेख नाही. आपण एकाच रंगाचे कपडे परिधान केले तर आपल्याला सामाजिकदृष्ट्या सुरक्षित वाटते. एकीची आणि समानतेची भावना प्रत्येकात निर्माण व्हावी आणि त्यासोबतच आनंद मिळावा, यासाठी ते केले जाते. कोणीही न सांगता अनेकजण त्या त्या रंगाचे कपडे परिधान करतात.
आजचा रंग : पिवळा
पिवळ्या रंगाचे महत्त्व :
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवशी पिवळा रंग परिधान केला जात आहे. प्रत्येक शुभ कार्यासाठी पिवळ्या रंगाचा उपयोग होतो. पिवळा रंग हा मन प्रसन्न, प्रफुल्लित करतो. हा रंग आपल्या भावनांशी जोडलेला असतो. बौद्धिक विकासासाठी, एकाग्रतेसाठी आणि मानसिक शांततेसाठी पिवळ्या रंगाचे महत्त्व अधिक आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती प्रसन्न, आनंदी दिसते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज असते.