‘राष्ट्रवादी कोणाची हे महाराष्ट्रातील शेंबडा पोरगा सांगेल’; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला टोला
![Jayant Patil said that the NCP will tell this Shembad Porga of Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Ajit-Pawar-and-Jayant-Patil-780x470.jpg)
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगात आज राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचा की अजित पवार गटाचा यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान, यावरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राष्ट्रवादी कोणाची हे महाराष्ट्रातील शेंबडा पोरगा सांगेल, असा टोला जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला लगावला आहे.
जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला जरी विचारलं की राष्ट्रवादी कोणाची, तर शरद पवारांची, असंच महाराष्ट्रातील नागरिक सांगतात. निवडणूक आयोगाने जर यात बदल केला तर महाराष्ट्रातील जनता ते सहन करेल, असं मला वाटत नाही.
हेही वाचा – ‘..अन्यथा टोलनाके जाळून टाकू’; राज ठाकरे यांचा इशारा
जयंत पाटील हे तळेगाव एमआयडीसी या ठिकाणी जनरल मोटर कामगारांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आले होते. तेव्हा, त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कामगारांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले.