IND vs BAN : बांग्लादेशविरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल!
![Big change in Indian team for match against Bangladesh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/IND-vs-BAN-780x470.jpg)
IND vs BAN : भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये आज आशिया चषकातील सुपर ४ मधील अखेरचा सामना अवघ्या काही मिनिटात सुरु होणार आहे. या सामन्यात टीम इंडियात मोठे बदल करण्यात आले आहेत.
आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्मा याला प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आले असून त्यासोबत सूर्यकुमार यादव आणि प्रसिद्ध कृष्णाचे टीम मध्ये पुनरागमन झाले आहे.. आजच्या सामन्यात रोहितने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. काय आहे प्लेइंग इलेव्हन पाहा थोडक्यात..
हेही वाचा – ईडीची मोठी कारवाई! देशभरात ३९ ठिकाणी छापे; ४१७ कोटींची मालमत्ता जप्त
भारतीय संघांची प्लेइंग इलेव्हन :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन , रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
बांगलादेश संघांची प्लेइंग इलेव्हन :
लिटन दास (विकेटकीपर), तनझिद हसन, अनामूल हक, शकीब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, मेहदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.