कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या
![Accused commits suicide in Kopardi torture case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Yerwada-Jail-780x470.jpg)
पुणे : अहमदनगर येथील कोपर्डीत १३ जुलै २०१६ रोजी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या खूनप्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. दरम्यान, आज पहाटे त्याने कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
कोपर्डी हत्याकांड प्रकरणातील आरोपी पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. यातील जितेंद्र शिंदे या आरोपीनं कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. पहाटेच्या सुमारास पोलीस कर्मचारी गस्तीवर गेले असताना जितेंद्र शिंदेनं आत्महत्या केल्याचं समजतं आहे.
हेही वाचा – राज्यात आज मुसळधार पाऊस, ‘या’ ६ जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’
त्यानंतर जितेंद्र शिंदेला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, डॉक्टरांनी जितेंद्र शिंदे याला मृत घोषित केलं. शिंदेनं कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली? हे अद्याप समजू शकलं नाही.