सांगली अपडेट: मराठा आंदोलनाच्या समर्थनार्थ सागांवमध्ये ‘रास्ता रोको’
विविध संस्था, संघटनांचा पाठिंबा : आंदोलनास पोलिस प्रशासनाचेही सहकार्य
![Sangli Update: 'Rasta Roko' in Sagaon in Support of Maratha Movement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Ram-Patil-780x470.jpg)
सांगलीः जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शांततामय मार्गाने आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजावर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ सागांव (ता. शिराळा, जि. सांगली) येथे सकल मराठा समाज-शिराळा तालुका सह आम आदमी पार्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी उद्यान चौक येथे रास्ता रोको करण्यात आले.
यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. काही प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. परंतु पोलिस प्रशासनाने तसेच स्थानिकांनी योग्य सहकार्य केले. रास्ता रोको आंदोलन शांततेत पार पडले.
यावेळी मराठा समाज आणि आपचे राम पाटील, मराठा समाजचे समन्वयक दिग्विजय पाटील, शिव-शंभो प्रतिष्ठान शिराळचे कैलास देसाई, मानसिंग पाटील यांनी आपली मनोगते व्यक केली. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणा देत सरकारचा निषेध गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली .
आंदोलनामध्ये यांची प्रामुख्याने उपस्थिती…
यावेळी सागाव गावच्या सरपंच अस्मिता पाटील तसेच सागावमधील तमाम मराठा बांधव उपस्थित होते. यामध्ये शिवाजी पाटील, दिलीप भोळे, राजेंद्र लुगडे, चंद्रकांत पाटील, संजय शेटे, शिवलिंग शेटे, अशोक साळुंखे, जितेंद्र देशमुख, विष्णु पवार, तानवडे आदी प्रामुुख्याने उपस्थित होते.