NCC ट्रेनिंगच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल
![NCC training students brutally beaten, video goes viral](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/ncc-college-in-thane-780x470.jpg)
मुंबई : NCC ट्रेनिंगच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयातील आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यानंतर आता विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्तपणे एनसीसीचं प्रशिक्षण देण्यात येतं. विद्यार्थ्यांना यादरम्यान आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षणपूर्वीचे धडेही दिले जातात. तसेच विद्यार्थ्यांकडून चूक झाल्यास त्यांना शिक्षाही दिली जाते. याच अमानुष शिक्षेचा हा व्हिडीओ आहे.
हेही वाचा – ‘देवेंद्र फडणवीसाचं उत्तर गोलमाल’, औरंगजेबच्या वादावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया; म्हणाले..
खूप भयानक आहे हे. ज्याप्रकारे हे सीनिअर एनसीसीचे विद्यार्थी शिक्षेच्या नावाखाली अमानुष मारहाण करत आहे.हेे पाहता त्यांना कशाचीच भीती नाही. हे काय पहिल्यांदा नाही होत आहे अनेक वेळा ह्या गोष्टी घडतात.पण ट्रेनिंग च्या नावाखाली अशी मारहाण केली जाते. #NCC #thane #joshibedekarcollege pic.twitter.com/df73N23w3e
— Padmesh Pawar || पदमेश पवार (@PawarPadmesh) August 3, 2023
कॉलेजच्या प्राचार्या काय म्हणाल्या?
विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये, असे प्रकार आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, सुचित्रा नाईक यांनी सांगितलं. एनसीसीचे प्रशिक्षक हे सिनियर विद्यार्थीच असतात. ते शिक्षक नसतात. मात्र, हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. या प्रकारामुळे एनसीसीकडून केली जाणारी चांगली लपली गेली आहेत. प्रशिक्षणादरम्यान घटनास्थळी शिक्षक उपस्थित नसताना हा प्रकार घडला आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर असे प्रकार यापुढे घडू नयेत, यासाठी एका समितीची स्थापनाही आम्ही करत आहोत. असे प्रकार कोणत्याही विद्यार्थ्यांबरोबर असतील तर त्यांनी अजिबात घाबरू नये. आम्हाला येऊन भेटावं. एनसीसी सोडण्याचा अजिबात विचार करु नये, असं प्राचार्या सुचित्रा नाईक म्हणाल्या.