धक्कादायक! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईंची कर्जतच्या एन. डी. स्टुडिओमध्ये आत्महत्या

पुणे : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जत येथील एन. डी. स्टुडिओत आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. मात्र आत्महत्येचं नेकमं कारण अद्याप समोर आलेले नाही. कलाविश्वातील दिग्गज व्यक्तीने टोकाचा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून आपलं प्रशिक्षण पुर्ण केलं होतं. १९८७ सालापासून त्यांनी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम सुरू केलं. २००५ साली त्यांनी कर्जतमध्ये त्यांचा एन. डी. स्टुडिओ उभा केला. याच स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – WI vs IND : भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय! वन डे सीरीज २-१ ने जिंकली!
Noted art director Nitin Desai found dead at his studio in Maharashtra's Raigad district: Official
— Press Trust of India (@PTI_News) August 2, 2023
नितीन देसोई यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मराठी, हिंदी सिनेमांसाठी कला दिग्दर्शनाचं काम केलं आहे. यामध्ये जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, माचिस, देवदास, लगान, प्रेम रतन धन पायो अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याशिवाय, त्यांना फिल्म फेअर पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे.





