Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबाबत BCCI ची मोठी घोषणा!
Jasprit Bumrah : एकदिवसीय विश्वचषक यंदा भारतात होणार आहे. यासाठीचे वेळापत्रकही ICC ने काही दिवसांपुर्वी जाहीर केलं आहे. दरम्यान या वेळापत्रकात फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबात प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या पुनरागमनाबाबत मोठी माहिती दिली आहे.
जय शाह म्हणाले की, विश्वचषक स्पर्धेच्या मूळ वेळापत्रकात काही बदल होण्याची अपेक्षा आहे, जे तीन-चार दिवसांत जाहीर केली जाईल. बदल कार्यक्रमात असतील, सामन्यांच्या ठिकाणात नाहीत. आयसीसी आणि बीसीसीआयचे अधिकारी यावर विचार करत आहेत. पूर्ण तंदुरूस्त झाल्यानंतर बुमराह ऑगस्टमध्ये आयर्लंडविरूद्ध टी-२० मालिकेत खेळू शकतो.
हेही वाचा – ‘महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लीम..’; संभाजी भिडे यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान
Jasprit Bumrah is totally fit and he might be going for the Ireland series: BCCI Secretary Jay Shah to ANI
(File Pic) pic.twitter.com/HWL5SUGCD9
— ANI (@ANI) July 27, 2023
बुमराह पूर्णपणे तंदुरूस्त आहे आणि तो आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठई खेळाडूंच्या निवडीत सातत्य राहील. तसेच विश्वचषक स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना मोफत सुविधांबद्दल बोलताना जय शाह म्हणाले, ते सामन्यांदरम्यान प्रेक्षकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यावर काम करत आहेत, एखा एजन्सीद्वारे हाऊसकीपिंग, टॉयलेटच्या सुविधा सुधारण्यास प्राधान्य दिले जात आहेत. त्याचबरोबर स्टेडियममधील स्वच्छतेवर देखील विशेष काम करण्यात येत आहे, अशी माहिती जय शाह यांनी दिली.
दरम्यान, जसप्रीत बुमराह सप्टेंबर २०२२ मध्ये तो ऑस्ट्रेलिया विरूद्ध शेवटचा सामना खेळला होता. या वर्षी मार्च महिन्यात न्यूझिलंडमध्ये पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यापासून त्याचा बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत संघात पुनरागमन करण्यासाठी सराव सुरू आहे.