breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लीम..’; संभाजी भिडे यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

मुंबई : आपल्या वादग्रस्त विधानामुळे सातत्याने चर्चेत असणारे श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचं एक विधान सध्या चांगलच चर्चेत आहे. महात्मा गांधींचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगतले जाते पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असं खळबळजनक विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

संभाजी भिडे म्हणाले की, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचंही संभाजी भिडे म्हणाले.

हेही वाचा – पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रोच्या विस्तारित मार्गाला ‘हिरवा कंदील’

देशामध्ये सर्वधर्मसमभावाचा उपदेश नकोच. अशा प्रकारचा उपदेश देणाऱ्या नेत्यांना राजकारणातून हद्दपार करावे. हिंदुस्थान हा जगाच्या पाठीवरील एकमात्र हिंदू बहुसंख्य देश आहे. हिंदूंचे शौर्य अफाट आहे. परंतु हिंदू स्वत:चा धर्म, कर्तव्य, जबाबदाऱ्या विसरला. हिंदुस्थानची फाळणी होऊन देश षंढ पुढाऱ्यांच्या हाती गेला आणि हिंदूंची व हिंदुस्थानची अधोगती झाली, असंही संभाजी भिडे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button