अजित पवार मुख्यमंत्री होणार? गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया चर्चेत

मुंबई : अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सातत्याने सुरू आहे. दरम्यान, अजित पवार एक ना एक दिवस नक्कीच मुख्यमंत्री होतील, असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी भूमिका मांडल्यावर दुसऱ्या कोणाचं काही मत असेल तर त्याला फार काही महत्व राहतं असं मला वाटत नाही. महायुतीत आमचे १०५ आमदार आहेत, आमच्या बरोबर जे सात आमदार आहेत त्यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार? कसा होणार? यावरील चर्चेला काही अर्थ नाही.
हेही वाचा – ‘ज्यादिवशी मंत्रीमंडळ विस्तार होईल, त्यादिवशी..’; बच्चू कडूंचं मिश्किल विधान
अशा प्रकारचं वक्तव्य महायुतीतल्या आमच्या कुठल्या सहकाऱ्याने करण्याऐवजी पक्षाचे वरिष्ठ नेते यावर भूमिका मांडतील. आमच्या सारख्या लोकांनी यावर बोलणं योग्य नाही. आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. ते याविषयावर बोलले आहेत, त्यामुळे या चर्चेला आता पूर्णविराम द्यावा आणि युती धर्माचं पालन करावं, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.





