Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

प्रतीक्षा संपली! शाहरूख खानच्या जवानचा प्रीव्यू रिलीज, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Jawan Trailer : अभिनेता शाहरूख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटाच्या ट्रेलर आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान, शाहरूखच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. शाहरूखच्या जवान सिनेमाचा प्रीव्यू आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलमध्ये बरेच अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत.

शाहरूख खानच्या ‘जवान’ चित्रपटात साऊथ सुपरस्टारस्ची तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरीजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगका, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा हे कलाकारही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा – ऐकावं ते नवलंच! टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर तैनात!

https://youtu.be/k8YiqM0Y-78

जवान सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अॅटलीने सांभाळली आहे. दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक म्हणून त्याची ओळख आहे. तर चित्रपटाची निर्मिती गौरी खानने केली आहे. हा सिनेमा ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची सर्वांनाच खुप उत्सुकता लागली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button