Tomato Price : सर्वसामान्यांना मोठा धक्का! टोमॅटोचे भाव वाढले
![Tomato prices have increased from Rs 80 to Rs 120 per kg](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Tomato-Price-780x470.jpg)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. अशातच आता सर्वसामान्यांना पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. देशातील बहुतांश किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ८० रुपये ते १२० रुपये किलोपर्यंत वाढले आहेत. तर कोथिंबिरीच्या जुडीचा दर १२० ते १७० रूपयांपर्यंत गेला आहे.
घाऊक बाजारात टोमॅटोचा भाव ३० ते ३५ रुपये किलोवरून आता ६५ ते ७० रुपये किलो झाला आहे. त्यामुळे टोमॅटोच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. काही ठिकाणी पाऊस लांबल्याने आणि अति उष्णतेमुळे टोमॅटोचे भाव वाढले आहेत. सततच्या नुकसानीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड बंद केली.
हेही वाचा – Bakri Eid : ‘बकरी ईद’ची सार्वजनिक सुट्टी आता २९ जूनला
https://twitter.com/ANI/status/1673549050665377794
टोमॅटोचे भाव का वाढले ?
बिपरजॉय चक्रीवादळादरम्यान झालेल्या पावसामुळे महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमध्ये टोमॅटो पिकावर परिणाम झाला आहे. तर बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये उष्म्यामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसना झालं आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांतील टोमॅटोची आवक घटली आहे. यामुळेच टोमॅटोचे भाव वाढले आहेत.