ब्रिजभूषण सिंह यांना क्लीन चिट, दिल्ली पोलिसांकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट
![Clean chit to Brijbhushan Singh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/brijbhushan-singh-780x470.jpg)
दिल्ली : अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक शोषण प्रकरणात ब्रिजभूषण शरण सिंह यांना दिल्ली पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट आणि चार्जशीट दाखल केली आहे. या प्रकरणात दोन न्यायालयांमध्ये चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सात मल्लांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. पटियाला हाऊस कोर्टात अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीसंदर्भातला क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. त्यात अल्पवयीन महिला कुस्चीपटूचं लैंगिक शोषण झाल्याचा सबळ पुरावा आढळला नाही त्यामुळे POSCO अंतर्गत कुठलेही आरोप लावता येणार नाहीत असं दिल्ली पोलिसांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्ट मध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा – ‘शरद पवार म्हणजे वैचारिक व्हायरस’; गुणरत्न सदावर्तेंची खोचक टीका
सात महिला कुस्तीगीरांनी २१ एप्रिल २०२३ रोजी दिल्ली पोलिसात बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषण प्रकरणात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी २८ एप्रिलला बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दोन प्रकरणं नोंदवली होती. पहिलं प्रकरण ६ कुस्तीगीर महिलांच्या लैंगिक शोषणाचं होतं. तर दुसरं प्रकरण एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाचं होतं.