‘औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार’; निलेश राणेंची खोचक टीका
![Nilesh Rane said Sharad Pawar is the reincarnation of Aurangzeb](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/sharad-pawar-and-Nilesh-Rane-780x470.jpg)
मुंबई : देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाबाबत चिंता वाटावी असं चित्र आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. दरम्यान, यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांची थेट औरंगजेबाशीच तुलाना केली आहे. त्यांनी ट्वीट करत ही टीका केली आहे.
निलेश राणे यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे की, निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात, कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार. असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/image-19.png)
हेही वाचा – कोल्हापुरातील हिदुत्ववादी संघटना आक्रमक, संघटनेकडून कोल्हापूर बंदची हाक
शरद पवार नमकं काय म्हणाले?
अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्यये घटना घडली आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्येही काही झालं. कुणी तरी मोबाईलवर मेसेज पाठवला. चुकीचा असेल, नाही असे नाही. पण त्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरूप देणं योग्य नाही. सत्ताधारी वर्ग अशा गोष्टीला प्रोस्ताहित करतो. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. पण राज्यकर्त्येच रस्त्यावर उतरायला लागले, त्यांचे सहकारी उतरायला लागले तर दोन समाजात जातीय कटुता निर्माण होत आहे. ते योग्य नाही.
लव्ह जिहादसारख्या नाही त्या प्रश्नांना फाजील प्रश्नांना महत्व दिलं जातं आहे. कारण नसताना समाज-समाजात तेढ वाढवतो. या सगळ्या गोष्टींसंबंधी मीडियानेही फार प्रसिद्धी देऊ नये. केरळमध्ये चर्चेवर हल्ले झाले. ख्रिश्चन समुदाय हा शांत स्वभावाचा असतो. समजा एखाद्याची चूक झाली असेल, तर चर्चेसवर हल्ला करण्याचं कारण काय? या हल्ल्यांमागे विशिष्ट विचारधारा दिसून येते. ती विचारधारा देशहिताची नाही. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज यांना संरक्षण देण्याची गरज आहे. अदिवासी आणि दलित समाज या घटकांना जपणं हे देखील सरकारचं काम आहे, असं शरद पवार म्हणाले.