मावळात खासदार निधीतून विविध विकास कामे सुरू; खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमिपूजन
![Various development works are started from MP fund in Maval](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/shrirang-barne-1-780x470.jpg)
पिंपरी : मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदार स्थानिक विकास निधी व जिल्हा नियोजन विभागामधून मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये विकास कामे सुरू केली आहेत. गोवीत्री, कांब्रे शिरदे, सोमवडी, भाजगांव, कोळवाडी, वळवंती या गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार बारणे यांच्या हस्ते करण्यात आला. खासदार बारणे यांनी मागील नऊ वर्षात सर्वाधिक निधी मावळसाठी दिला आहे.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब नेवाळे, पंचायत समितीचे माजी सभापती गुलाब म्हाळसकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, मुन्ना मोरे, विशाल हुलावळे, चंद्रशेखर भोसले, सरपंच वैशाली गायकवाड, स्वामी गायकवाड, सरपंच योगेश केदारी, रोहिदास जांभुळकर, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – पाकिस्तानी ड्रोन पाडले, BSF जवानांची मोठी कारवाई
खासदार श्रीरंग बारणे यांचे मावळ तालुक्यावर विशेष लक्ष आहे. मावळ तालुका वाड्या-वस्त्यांमध्ये विस्तारला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये दळणवळणासाठी रस्त्यांचा अभाव आहे. अंतर्गत रस्ते नाहीत. त्याकरिता खासदार बारणे यांनी खासदार निधी आणि जिल्हा वार्षिक निधीतून मावळ तालुक्यातील अंतर्गत रस्ते करण्यावर भर दिला आहे. खासदार बारणे यांनी मागील नऊ वर्षात मावळ तालुक्याला सर्वाधिक निधी दिला आहे.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पवन, आंदर आणि नाणे मावळातील ग्रामपंचायतींना गावच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. गोवीत्री, कांब्रे शिरदे, सोमवडी, भाजगांवातील स्थानिक नागरिक या भागातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब नेवाळे यांच्या मागणीनुसार निधी दिला. त्यातून गावात विकास कामे सुरू झाली आहेत. सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून काम करावे. गावाचा चांगला विकास करावा. छत्रपती शिवाजी महाराज यांची मावळ ही भूमी आहे. महाराजांनी याच भूमीत मावळे घडविले. महाराजांनी जगावर राज्य केले. आपण महाराजांच्या भूमीतील आहोत. सर्वांनी एकोप्याने काम करावे.