Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी
Whatsapp New Update : व्हॉट्सअॅप आणणार ‘हे’ जबरदस्त फीचर..
Whatsapp New Update : जगभरात लोकप्रिय असणारे व्हॉट्सअॅप आता काही दिवसांत अँड्रॉइड डिव्हाईस वापरकर्त्यांना स्क्रीन शेअरिंग फीचर प्रदान करणार आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp बीटा आवृत्ती २.२३.११.१९ मध्ये व्हिडिओ शेअरिंग दरम्यान स्क्रीन-शेअरिंग फीचरची चाचणी करत आहे, ज्याद्वारे कॉलिंग अनुभव आणखी खास होणार आहे.
हेही वाचा – ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर यूजर्सना व्हिडिओ कॉलिंगदरम्यान कॅमेरा स्विच ऑप्शनच्या पुढे दिसणार आहे. व्हिडिओ कॉलिंग सुरू असतानाच वापरकर्ते कधीही स्क्रीन शेअर करणे थांबवू शकणार आहेत. याशिवाय, जेव्हा अॅप वापरकर्ता त्याच्या स्क्रीन शेअरिंगसाठी परवानगी देईल, तेव्हाच हे फीचर सक्रिय होईल.