breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात

पुणे : भारतीय संघाचा फलंदाज व आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू ऋतुराज गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ऋतुराजने आयपीएल सीजन जिंकल्यानंतर होणाऱ्या पत्नीबरोबरचा फोटो शेअर केला होता. तेव्हापासून त्याच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत.

ऋतुराज गायकवाड उत्कर्षा पवारसोबत ३ जून रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. ऋतुराज आणि उत्कर्षा यांच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये ऋतुराज आणि उत्कर्षा आपापल्या हातावरील महंदी दाखवताना दिसत आहेत.

हेही वाचा – Ashadhi Wari 2023 : संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी सोन्या-खासदार बैलजोडीला मान

ऋतुराजने एका हातावर लग्नाची तारीख लिहिण्यात आली आहे. तर दुसऱ्या हातावर दोघांच्याही नावाचे इंग्रजीतील पहिले अक्षर घेऊन बॅट व बॉलचं उत्कृष्ट डिझाइन काढण्यात आलं आहे. ऋतुराजच्या या मेहंदीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

ऋतुराजची होणारी पत्नी कोण आहे

ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीचं नाव उत्कर्षा पवार असं आहे. उत्कर्षादेखील एक क्रिकेटपटू आहे. तिचा जन्म १३ ऑक्टोंबर १९९८ रोजी झाला असून ती २४ वर्षांची आहे. उत्कर्षा आणि ऋतुराज एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button