‘महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही’; मराठी संघटनेचा थेट इशारा
![Rajendra Jarad said that the program will not be allowed in Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/gautami-patil-1-780x470.jpg)
पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचं नृत्य अश्लील असल्याचा तिच्यावर सातत्याने आरोप होत आहे. त्याबद्दल गौतमीने अनेकवेळा दिलगीरी व्यक्त केली आहे. मात्र तरीदेखील तिच्यावर टीका होतच आहे. दरम्याम, गौतमीचा कार्यक्रम होऊ न देण्याचा इशारा मराठा समन्वयक राजेंद्र जराड यांनी दिला आहे.
राजेंद्र जराड म्हणाले की, गौतमी पाटील ही पाटील हे आडनाव लावून पाटलांची बदनामी करत आहे. गौतमी पाटील हिचं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. तिने गौतमी चाबुकस्वार हे आडनाम लावूनच कार्यक्रम करावेत. तिने पाटील आडनाव टाकावं. पाटील आडनाव लावून तिने कार्यक्रम केल्या तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा राजेंद्र जराड यांनी दिला आहे.
हेही वाचा – शिवसेना शिंदे गट-भाजपा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला? राहुल शेवाळेंची माहिती
दरम्यान, पिंपरी- चिंचवडमध्ये वाढदिवसाच्या निमित्त नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले म्हणून आयोजकावर भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासारवाडी येथील युवा कार्यकर्ते अमित शंकर लांडे यांचा सोमवारी (२२ मे रोजी) वाढदिवस होता. यानिमित्त त्यांनी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या डान्सचा जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी हा क्रायक्रम पार देखील पडला. मात्र आयोजक असलेले अमित शंकर लांडे यांच्यावर परवानगी नसताना गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित केला म्हणून भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.