‘स्त्रियांचं शरीर मौल्यवान, जितकं जास्त झाकलेलं तितकं छान’; सलमान खानचं विधान
![Salman Khan said that women's bodies are precious, the more covered the better](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/salman-khan-780x470.jpg)
मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या पलक तिवारीने सलमान सेटवर काम करणाऱ्या सगळ्या मुलींना स्वत:चे अवयव नीट झाकले जातील असे कपडे घालायची सक्ती करतो, असं म्हटलं होतं. दरम्यान, सलमान खानने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.
सलमान खान म्हणाला की, मला असं वाटतं की, स्त्रियांचं शरीर मौल्यवान आहे. ते जितकं जास्त झाकलेलं असेल तितकं छान दिसेल.
पलक तिवारी नेमकं काय म्हणाली?
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, पलक तिवारीने सलमानच्या चित्रपटाच्या सेटवर मुलींच्या कपड्यांबद्दल एक नियम असल्याचं म्हटलं होतं. आता तिने स्पष्टीकरण दिलं आहे. ती म्हणाली की, गैरसमज हा आमच्या कामाचा एक भाग आहे. माझ्या आणि सलमान सरांमधील बातम्यांमुळे मला आश्चर्य वाटत नाही, कारण मला माहित आहे की ते खूप समजूतदार व्यक्ती आहे. त्याच्याबद्दल मी कधीही वाईट बोलणार नाही हेही त्यांना माहिती आहे. माझ्याकडून चूक झाली, मी शिकेन आणि मी या गोष्टीची नेहमी काळजी घेईन, असं पलक म्हणाली.