कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राचं ट्वीट; म्हणाला,..
आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा
![Neeraj Chopra said that the protesting wrestlers should get justice at the earliest](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Neeraj-Chopra-780x470.jpg)
दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरूद्ध कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू आहे. आता अनेक राजकीय नेते पैलवानांच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. दरम्यान, आता कुस्तीपटूंना ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा यांनी समर्थनार्थ ट्वीट केले आहे.
नीरज चोप्रा म्हणाले की, ब्रिजभूषण सिंगच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा. आमच्या खेळाडूंना रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करताना पाहून मला वेदना होत आहेत. त्यांनी आमच्या महान राष्ट्राचे प्रतिनिधित्व करून आम्हाला अभिमान वाटावा यासाठी खूप चांगले काम केले आहे.
एक राष्ट्र म्हणून प्रत्येक माणसाची अखंडता आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. जे घडत आहे ते कधीही घडू नये. हा एक संवेदनशील मुद्दा आहे आणि तो निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने हाताळला गेला पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून न्याय मिळवून द्यावा, असं नीरज चोप्राने म्हटलं आहे.