राज्यात पुन्हा मास्क सक्ती होणार? गिरीष महाजन यांनी दिली महत्वाची माहिती
![Minister Girish Mahajan said that masks will be made compulsory again in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Covid-19-india-780x470.jpg)
मुंबई : देशासह महाराष्ट्रातही कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात २५ समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोविडबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे खबरदारी म्हणून सर्वांनी मास्क लावावा, तसेच वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सर्वांनी मास्क लावून काम करावे असे निर्देशही यावेळी दिलेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात २५ समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित करण्यात आली आहेत.
शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, ऑक्सिजनचा साठा, उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची संख्या, रेमीडिसीव्हीरची उपलब्धता, रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना, गरज पडल्यास अतिरिक्त डॉक्टर्सची उपलब्धता अशा विविध विषयांचा आढावा मंत्री गिरीष महाजन यांनी घेतला.
यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी,वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर,वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.