देशात कोरोनाचा कहर! गेल्या २४ तासांत ९,१११ नव्या रूग्णांची नोंद
देशातील सक्रिय रूग्णांची संख्या ६० हजारांवर
![India records 9,111 new cases and 6,313 recoveries in 24 hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/covid--780x470.jpg)
Covid-19 : भारतात दिवसोंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रोज कोरोना रूग्णांचा धडकी भरवणारा आकडा समोर येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात मोठ्यासंख्येने कोरोना रूग्णांत वाढ झालेली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये देशात ९,१११ कोरोना रूग्ण आढळले आहेत. रविवारी अढळलेल्या रूग्णांच्य आकडेवारीनंतर देशातील सक्रिय रूग्णांची संख्या ६० हजारांच्या वर गेली आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये २७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये गुजरातमध्ये ६, उत्तर प्रदेशमध्ये ४, राजस्थान आणि दिल्लीत प्रत्येकी ३, महाराष्ट्रातील २ आणि तामिळनाडू, केरळमध्ये प्रत्येकी १ रूग्णाचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ५,३१,१४१ रूग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
गेल्या २४ तासांत ६,३१३ रूग्ण बरे झाले आहेत. या आजारातून बरे झालेल्या लोकांची एकूण संख्या ४,४२,३५,७७२ इतकी आहे. दैनंदिन सकारात्मकता दर ८.४० % नोंदविला गेला आणि साप्ताहिक सकारात्मकता दर ४.९४ % इतका नोंदवला गेला, असे आरोग्य मंत्रालयाच्या डेटाने म्हटले आहे.