खासदार संजय राऊत यांनी राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी, तरच त्यांचे सरकार येईलः अब्दुल सत्तार
![MP, Sanjay Raut, resigns, Govt., will come: Abdul Sattar,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Abdul-Satar-780x470.jpg)
नंदुरबार : पुढची गुढी आपलीच असणार, असे म्हणणारे उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून दाखवावे, त्या वेळेस तुमचे सरकार येईल, असा टोला लगावत अब्दुल सत्तारांनी संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेतला.
नंदुरबार तालुक्यातील गारपीटग्रस्त भागातील नुकसानीच्या पाहणीसाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार बुधवारी आले होते. या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय शीघ्रगतीने निर्णय घेतले आहेत.
ते म्हणाले, की राऊत आमच्या मतांवर निवडून आलेले आहेत. त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर दादा भुसे यांनी दिलेले चॅलेंज स्वीकारावे आणि पुन्हा निवडून दाखवावे. त्या वेळेस तुमचे सरकार येईल आणि राऊत यांनी राजीनामा दिला नाही तर दोन-चार पिढ्या यांचे सरकार येणार नाही.
अब्दुल सत्तार यांनी खासदार संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. संजय राऊत सातत्याने काही ना काही बोलत असतात. आमच्यावर आरोप करीत असतात. असे आरोप केले नाही तर त्यांची कोणीही दखल घेणार नाही याची त्यांना जाणीव असावी. त्यामुळेच ते असे आरोप करीत असावेत. मात्र संजय राऊत यांचा नातू जरी आला तरी त्यांचे सरकार येणार नाही.