‘दाऊद इब्राहिम, ओसामा बिन लादेन आणि राहुल गांधींमध्ये काही फरक नाही’; नितेश राणेंची टीका

राहुल गांधींवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी ब्रिटन दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी हार्वर्ड आणि केंब्रिज विद्यापीठात संबोधित केलं. तेव्हा राहुल गांधी भाजपावर जोरदार हल्ला केला आहे. आता यावरून भाजपा आमदार नितेश राणेंनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडत त्यांची दहशतवाद्यांशी तुलना केली आहे.
राहुल गांधींवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. बाहेर देशांत भारताची बदनामी करून टाळ्या मिळवत आहेत. हे देशद्रोह्यासारखं आहे. म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला टाकला पाहिजे. जेवढा द्वेष पाकिस्तान करतो, तेवढाच राहुल गांधी करत आहेत. पाकिस्तान आणि राहुल गांधींची भाषा एकच असून, त्यांना देशाबाबत बोलण्याचा अधिकार नाही, असं नितेश राणे म्हणाले.
राहुल गांधी ज्या घरात राहतात सुविधा वापरतात ते भारत सरकारच्या आहेत. त्याच भारताची तुम्ही बदनामी करत असाल, तर दाऊद इब्राहिम, ओसामा बिन लादेन आणि राहुल गांधींमध्ये काही फरक नाही. पाकिस्तान आणि राहुल गांधी एकच आहेत, अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.





