Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘शरद पवारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे’; रामदास आठवले

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सरकारमध्ये गेलेले नाहीत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये भाजपाला जो पाठिंबा दिला आहे. यावरून सत्ताधारी पक्षातील नेते राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका करत आहेत. यावरून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, असं आवाहन केलं आहे.

शरद पवार यांनी नागालँडमध्ये जो पाठिंबा दिला. तसा पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला देखील पाठिंबा द्यावा. आपल्यासारखा अनुभवी नेता आमच्यासोबत असला पाहिजे. त्यामुळे पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावं, असं रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर युती केली असली तरी ती किती टिकेल हे सांगता येत नाही. प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले असले तरी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये गेलेले नाहीत. त्यामुळे ते कुठेही गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, असंही रामदास आठवले म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button