निकालापूर्वीच पिंपरी-चिंचवडमध्ये झळकले अश्विनी जगताप यांच्या विजयाचे बॅनर
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि पिंपरी-चिंचवड शहरात फ्लेक्सबाजी
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. मात्र यापुर्वीच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि पिंपरी-चिंचवड शहरात फ्लेक्सबाजी पाहायला मिळत आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छाा..अशा आशयाचे फलक लागले आहेत.
कसब्याचे उमेदवार हेमंत रासने आणि रवींद्र दंगेकर यांचे निकाल लागण्या अगोदर आमदारकीचे फ्लेक्स लागले होते. त्याचे लोण आता पिंपरी चिंचवड शहरात देखील पोहचले आहे.
पिंपरी चौक आणि पुणे – मुंबई महामर्गवार उर्से टोल नाक्यावर अश्विनी जगताप यांच्या आमदारकीचे फ्लेक्स लावले आहेत. त्यामुळे आता चिंचवडमध्ये देखील भाजपची फ्लेक्स बाजी होताना पहायला मिळत आहे. त्यामुळे चर्चेला एकच उधाण आले आहे.
अश्विनी जगताप यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल पिंपरी आणि उर्से टोलनाक्यावर अभिनंदनाचे फ्लेक्स लागले आहेत. चिंचवड पोट निवडणुकीत सर्व पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे राज्यभराचे लक्ष या निवडणुकीकडे आहे.