इंद्रायणी थडी 2023 महोत्सवाची परदेशी नागरिकांनाही भुरळ
![Indrayani Thadi 2023 festival attracts foreigners too](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/foreiner-in-indrayani-dhadi-780x470.jpg)
अमित शेळके । भोसरी । महाईन्यूज ।
भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे आणि शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून इंद्रायणी थडी 2023 महोत्सव सुरू आहे. इंद्रायणी थडीला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवामध्ये 1000 पेक्षा अधिक स्टॉल आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/image-39.png)
इंद्रायणी थडी 2023 महोत्सवाचे परदेशी नागरिकांनाही भुरळ पडत आहे. जर्मनी येथील पर्यटकांनी इंद्रायणी थडीला भेट दिली आहे.इंद्रायणी थडी महोत्सवाचे परदेशी नागरिकांनाही आकर्षण निर्माण झाले आहे. इंद्रायणी थडीचे खास आकर्षण म्हणजे याठिकाणी ग्रामसंस्कृती, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, मावळ्यांचे इतिहास दाखवण्यात आला आहे.
खाद्य संस्कृती मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा स्वाद पिंपरी चिंचवड येथील नागरिक घेत आहेत.इंद्रायणी थडी महोत्सवात विविध पेंटिग, महिलांनी स्वतः तयार केलेल्या सुंदर कलाकृती पाहायला मिळत आहेत. स्टॉल वरील विविध गोष्टी खरेदी होत असल्याने स्टॉल धारक समाधान व्यक्त करत आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/image-40-1024x768.png)
इंद्रायणी थडी 2023 महोत्सवात लहान मुलांसाठी खेळण्यासाठी विविध खेळणी याठिकाणी आहेत.इंद्रायणी थडीचे विशेष आकर्षण म्हणजे श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती होय. अयोध्येत राम मंदिराच्या भव्य मंदिराचे बांधकाम सुरू आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर इंद्रायणी थडीला भेट देत आहेत. त्यातच आता जर्मनीतील पर्यटकांनाही इंद्रायणी थडीची भुरळ पडली आहे.