अब्दुल सत्तारांच्या तोंडून पवारांचे कौतुक; म्हणाले, पवारांची पॉवर अशीच कायम राहो
![Abdul Sattar said that Sharad Pawar's power will continue like this](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/abdul-sattar-1-780x470.jpg)
शेतकऱ्यांना 1 रूपयात विमा द्यावा; केंद्र सरकारकडे मागणी
बारामती : बारामती येथील माळेगाव येथे एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्र आयोजित कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाल महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे बारामती येथे उपस्थित होते. यावेळ त्यांनी शरद पवार यांच्या पासून ते रोहित पवार यांची नावं घेत पवारांची पॉवर अशीच कायम राहो, हीच प्रार्थना करतो, असं म्हणाले. काही महिन्यापुर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे अचानक कसे बदलले अशी चर्चा होत आहे.
बारामती येथे कृषी प्रदर्शनाला मी कृषीमंत्री म्हणून आलो आहे. इथे मी राजकीय पुढारी म्हणून आलो नाही. बारामतीमध्ये खूप चांगलं कृषी प्रदर्शन भरवलं आहे. 2023 मधलं प्रदर्शन आहे. या ठिकाणी असलेली शेती बघितल्यावर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि राजेद्र पवार यांचं शेतीतलं योगदान पाहायला मिळत आहे. जुनी शेती नवी करण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे. इथे तंत्रज्ञान वापरून कशी शेती केली जाते, याचे प्रात्यक्षिक आहे. प्रत्येक शेतकऱ्याने इथे येऊन हे प्रदर्शन पाहिलं पाहिजे. या ठिकाणी केल्या जाणाऱ्या संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांना होतो. येथे काही मिळालेल्या गोष्टी, प्रयोगावर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न राहु, इथे येऊन प्रदर्शन पहावे आणि तशी शेती करावी, असे माझे शेतकऱ्यांना आव्हान आहे, असं मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
शेतकऱ्यांना मोफत वीज देणे हा घोरणात्मक निर्णय आहे. यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर निर्णय घेतील. कृषी मंत्री या नात्याने माझे मागणी करणे काम आहे. शेतकऱ्यांना 1 रूपयात विमा द्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. मार्च पर्यंत येणाऱ्या बजेटमध्ये योग्य ती तरतूद केल्याचे सत्तार म्हणाले.