तनिष्क कॉलनी, जगताप डेअरी-विशाल नगरमध्ये दुर्गंधीमुळे रहिवाशी हैराण
- चेंबर व लेबरकॅम्पच्या अनाधिकृत संडासची लाईन पालिकेच्या मलनिस्सारण वाहिनीला जोडली
पिंपरी-चिंचवडः
तनिष्क कॉलनी जगताप डेअरी विशाल नगरमध्ये जलनिस्सारण वाहिनी व मलनिस्सारण वाहिनी या सर्वे.न. २७,२८ च्या बॉर्डरवर टाकले असून पावसाळ्यापूर्वी चांगल्यारितीने दुरुस्त केल्या असून योग्य रीतीने प्रवाहित होत्या पण आता तनिष्क कॉलनीच्या पश्चिमेला अनाधिकृत लेबरकॅम्प झाला असून त्यांनी अनधिकृतपणे संडासची लाईन पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या मलनिस्सारण वाहिनीला जोडली आहे.
जलनिस्सारण वाहिनी जेसीबी मशीनच्या सहायाने अनेक ठिकाणी खोदून चेंबरच्या खड्यात दगड विटा टाकून बंद केले आहे तसेच त्यांनी अनधिकृतपणे संडासची लाईन उघड्यावर सोडली आहे. त्यामुळे जलनिस्सारण वाहिनी व मलनिस्सारण वाहिनी या बंद पडल्या असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही लाईन बंद झाल्या असून पिण्याचे पाणी सुद्धा कधी कधी गढूळ, पिवळसर व दुर्गन्धीयुक्त येत असते. त्यामुळे कॉलनीतले रहिवासी पुरते हैराण झाले आहेत. त्यावर तातडीची उपाययोजना करण्याची मागणी रहिवासी करत आहेत.





