“तर नारायण राणे पन्नास वर्षे जेलमधून सुटणार नाहीत”; संजय राऊतांचा राणेंना इशारा
![Sanjay Raut said that Narayan Rane will not be released from jail for fifty years](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/sanjay-raut-and-narayan-rane-780x470.jpg)
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सामनातील अग्रलेखाचा उल्लेख करत खासदार संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार असं विधान केलं होतं. या राणेंच्या विधानाला आता खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मी नारायण राणेंवर कधीही अग्रलेख लिहिला नाही. ते म्हणत असतील हे कारागृहात जाणार आहेत, तर त्यांनी आमचा कारागृहात जाण्याता मार्ग मोकळा करून द्यावा. त्यांच्यासारखे आम्ही डरपोक आणि पळपुटे भित्रे नाही. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाही. त्यांनी धमकीची भाषा करू नये. धमक्या द्यायच्या असतील तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या, मग दाखवतो मी. राणे यांनी माझ्या नादाला लागू नये.झाकली मुठ सव्वालाखाची, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
हे काय मला जेलमध्ये टाकतात. पक्षासाठी हिमतीने जेलमध्ये गेलो. तुमच्यासारखी शरनागती पत्कारली नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. तुम्ही कायद्याचे बाप झाला आहात का? मला जेलमध्ये पाठवण्याची भाषा करणाऱ्यांची माहिती सर्वोच्च न्यायासयाच्या मुख्य न्यायमूर्तीना पाठवली आहे. नारायण राणे यांच्या आर्थिक घोटाळ्यांची प्रकरणे काढली तर पन्नास वर्षे जेलमधून सुटणार नाहीत, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.