Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबई

जामीन मिळाल्यानंतर अनिल देशमुखांना अधिवशेनाला जाता येणार का?

नागपूरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात जल्लोष

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. देशमुखांविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या जामीनाला स्थगिती वाढीव देणारा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र त्यांना मुंबईतून तीन महिने तरी बाहेर जाता येणार नाही अशी अट मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या घातली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला देखील अनिल देशमुख हजर राहू शकणार नाहीत.
माजी मंत्री अनिल देशमुख आज बाहेर येणार आहेत. अनिल देशमुख नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाला ते जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र न्यायालयाने जमीन देताना टाकलेल्या एका अटीमुळे ते हिवाळी अधिवेशनाला मुकणार असल्याचं बोललं जात आहे. न्यायालयाने देशमुखांना जामीन देताना त्यांना मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळाल्यानंतरही अधिवशेनाला जाता येणार नाही.
अनिल देशमुख यांना गेल्या 13 महिन्यांपासून आर्थर रोड कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. मात्र उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज ते कारागृहातून सुटणार आहेत. यामुळे अनिल देशमुख यांच्या मतदारसंघ असलेल्या नागपूर विभागामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
देशमुख कारागृहातून बाहेर आल्यानंतर नागपूर मध्ये केव्हा दाखल होतात याची वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना आणखी काही दिवस अनिल देशमुख यांची नागपूर मध्ये घेणे संदर्भात वाट पहावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनानंतर अनिल देशमुख यांना तीन महिने तरी मुंबई सोडता येणार नसल्याची माहिती अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून मिळाली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button