“पक्षाने जर आदेश दिला तर मी ही पोटनिवडणुक लढवणार”; रूपाली ठोंबरे
टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांना उमेदवारी द्यावी
पुणे :
कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतच निधन झालं आहे. आता जी पोटनिवडणुक लागणार आहे. यामध्ये पक्षाने जर आदेश दिला तर मी ही निवडणुक लढवणार आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी केलं आहे. 2019 ला मनसेने माझं तिकीट मुक्ता टिळक यांच्या साठी कापलं होतं असंही त्या म्हणाल्या.
पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा त्यांनी करायला पाहिजे ज्यांनी सगळ्याच पोटनिवडणुका बिनविरोध केल्या आहेत. याआधी पंढरपूरची पोटनिवडणूक झाली, त्यानंतर मुंबईत झालेल्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना किती त्रास झाला आणि तो कोणी दिला हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे आताची ही पोटनिवडणूक हसत खेळत झाली पाहिजे, असंही रूपाली पाटील म्हणाल्या.
खरंतर मुक्ता टिळक या आजारी असल्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघात कोणतीही विकासाची कामे झाली नाहीत. पण त्यांना आजाराचा खूप त्रास होता त्यामुळे राजकारणात आजारपणापेक्षा काही मोठं नसतं. त्यामुळे पोटनिवडणुकीत जनता जो कौल देईल तो मान्य असेल. त्यामुळे ही पोटनिवडणूक खेळीमेळीत व्हायला हवी, असं रुपाली पाटील म्हणाल्या.
सोबतच, गेल्या काही वर्षा पासुन ज्या विद्यामान आमदारांचे दुर्दैवाने निधन होते त्यांच्या परिवारातील व्यक्तीला बिनविरोध निवडुण देण्याची नवीन परंपरा या महराष्ट्राने सुरू केली आहे. त्याला अनुसरून मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजप नेते उज्ज्वल केसरकर यांनी केली आहे.